*मांजरपाडा पाण्याने पुणेगाव दरसवाडी सह पालखेडही तुडुंब...*

  मांजरपाडा पाण्याने पुणेगाव दरसवाडी सह पालखेडही तुडुंब...

 कुणी पाणी घेते का पाणी 



येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग म्हणजे अतिशय दुष्काळी भाग. या भागाला कधी पाणी येईल आणि या भागाचा दुष्काळ संपेल असा विचार कोणी स्वप्नात सुद्धा केला नसेल.1972  सालापासून पुणेगाव दरसवाडी कालव्याचे पाणी या भागात येईल असं कधीही न पूर्ण होणार स्वप्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण गेलेलं होतं. पण सलग 53 वर्षात या भागात कधीही पाणी आलं नाही. 2004 नंतर ना छगन भुजबळ यांनी येवल्याचं नेतृत्व स्वीकारल आणि या भागाला पाणी येईल अशी नव्याने आशा निर्माण झाली होती.  2007 मध्ये या भागात पूर्णपणे नव्याने कालव्याचे काम पूर्ण झाले आणि शेतकऱ्यांना पाणी येईल असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात पाणी आलेच नाही कारण आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून ही गोष्ट त्या काळी निदर्शनास आली. 1972 आणि 2007 या 35 वर्षात नैसर्गिक परिस्थिती बदलली होती. 


त्यामुळे पुणेगाव मध्ये येवला तालुक्याला पोहोचेल इतके पाणी उपलब्ध होऊ शकत नव्हते. यावर पर्याय म्हणून ना भुजबळांनी नव्याने येवला तालुक्यासाठी हक्काचे उपलब्ध पाणी होईल असा शोध सुरू केला. यातूनच मांजरपाडा प्रकल्पाचा पर्याय उपलब्ध झाला. ना भुजबळ यांनी आपली मंत्री पदाची ताकद पणाला लावून मांजरपाडा प्रकल्प साठी 570 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आणि प्रत्यक्षात कामही सुरू केले.


 2019 मध्ये मांजरपाडाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आणि मांजरपाडा मधून पुनेगाव मध्ये पहिल्यांदा पाणी आले. त्यावेळेस 2019 मध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यांना वाटू लागलं होतं येवल्याचा उत्तरपूर्व भागात पाणी येईल आणि हा भाग आता बागायती होईल. मात्र 2019 मध्ये पाण्याची चाचणी घेतल्यानंतर 105 किलोमीटर म्हणजे येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत पाणी पोहचवण्यात यश आले. तेही मुबलक पाणी आले नाही. पाण्याची उपलब्धता यावर आता मांजरपाडा हा ठोस मार्ग निघालेला असला तरी 163 किलोमीटर पाणी पोहोचवणे ही खरी जिकिरीची काम होते. मांजरपाडाचे पाणी येवला तालुक्यात पोहोचविण्यासाठीच्या अडचणींची माहिती प्रशासनाकडून ना छगन भुजबळ यांनी समजून घेऊन तसेच वारंवार कालव्यावर पाहणी करून पर्यायची चाचपनी केली. यातून कालव्याला काँक्रिटीकरण हा एकमेव पर्याय समोर आल्याने  ना भुजबळ यांनी प्रशासनाकडून या कामाचा प्रस्ताव मागविला आणि  मंत्रीपदाची पूर्ण ताकद लावून या भागासाठी २६३ कोटी रुपये काँक्रिटीकरण साठी मंजूर करून घेतले आणि अवघ्या एक वर्षात काँक्रिटीकरांचे काम देखील पूर्ण झाले. काँक्रीटिकरण चे काही काम अपूर्ण असताना 2024 मध्ये डोंगरगावला पहिल्यांदा पाणी पोहोचले मात्र तेव्हाही काही बंधारे भरले तर काही बंधारे भरायचे राहिले होते. आज मात्र 2025 मध्ये गेल्या एक महिन्यापासून या भागात कालव्याला पाणी सुरू असून अजूनही काही दिवस पाणी सुरु राहणार आहे. कातरणी ते डोंगरगाव पर्यंतचे सोमठाणे, विखरणी, कानडी, आडगाव, बाळापूर कासारखेडे अनकुटे, हडपसावरगाव, नगरसूल, अंगुलगाव, सायगाव, नांदूर धामोडे गारखेडे, कौटखेडे सह कालव्याच्या परिसरातील सर्व बंधारे  भरले गेले आहेत. अजून काही दिवस पाणी सुरू असल्याने कोणी पाणी घेते का पाणी कुणी पाणी घेता का पाणी अशी बक्कळ पाण्याने परिस्थिती निर्माण झालेली आहे.


एकीकडे पुणेगाव दरसवाडी कालव्याला पाणी मांजरपाडा मधून नव्याने आले आणि लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे पाण्याने तृप्त झाले. दुसरीकडे पालखेडच्या पाण्यासाठी देखील आंदोलने करून पाणी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत होते. कधी निफाड मध्ये कालवा फुटत होता तरी कधी पाणीच येत नव्हते. मात्र मांजरपाडाचे पाणी अतिरिक्त  पालखेड कालव्याला मिळाल्याने कधीही इतक्या दिवस न चालणारा हा पालखेड कालवा अविरत आजही सुरूच आहे. कोपरगाव वैजापूर तालुक्यात देखील हे पाणी गेले आहे. पाण्याची मागणी पूर्ण झालेली असून आता तरी पाणी बंद करा असे शेतकरी बोलू लागल्या आहेत.


मा ना छगनरावजी भुजबळ यांच्या माध्यमातून मागील वर्षी कॉंक्रिटीकरण चे काम अपूर्ण असताना मांजरपाडाचे पाणी येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात आले. अपूर्ण काँक्रिटीकरण कामामुळे  पाणी कमी आल्याने पाणी फक्त दाखविण्या पुरतेच आहे का असे राजकीय आरोप केले गेले होते. मात्र यावर्षी काँक्रिटीकरांचे काम पूर्ण झाल्यानंतर मांजरपाडाचे पाणी येवला तालुक्याला पाहीजे तितके उपलब्ध झाले आहे. लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे भरले गेले असून खऱ्या अर्थाने या भागातील शेती आता बागायती झाली आहे. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव भुजबळ कालवा हा प्रकल्प पूर्ण झाला असून यशस्वी देखील झाला आहे. हा कालवा पालखेड विभागाकडे हस्तांतरण करण्याच्या सूचना ना भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या असून लवकरच कालवा पालखेड विभागाकडे हस्तांतरण करण्यात येईल 

       डॉ मोहन शेलार 

       पाणी आंदोलक

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने