जलजीवन योजना अंतर्गत पाटोदा गावाला 38 गाव योजनेतून पाणीपुरवठा करा.... मा ना छगन भुजबळ यांच्या प्रशासनाला सूचना
दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मतदार संघातील सर्व जलजीवन योजनांच्या कामाचा आढावा बैठक आयोजित केली होती. मतदारसंघातील निफाड तालुक्यातील 26 गावात मा ना छगन भुजबळ यांचे पाठपुराव्याने जलजीवन योजना अंतर्गत काम मंजूर करण्यात आलेले होते. कानलद येथील अपवाद वगळता 25 गावांच्या योजना पूर्ण झाल्या असून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील 36 गावात मा ना छगन भुजबळ यांचे पाठपुराव्याने जनजीवन योजनेच्या अंतर्गत पाणी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. पैकी 25 गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू असून 11 गावांना अद्याप पाणीपुरवठा सुरू नसल्याने मा ना छगन भुजबळ यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ योजना पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
कामे अपूर्ण असलेल्या गावापैकी पाटोदा, ठाणगाव आणि कानडी या ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य असताना देखील विहिरीचे पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठा योजना साठी विहिरीचे पाणीपुरवठा केला जाईल अश्या स्वरूपाच्या मंजूर करण्यात आल्याचे डॉ मोहन शेलार यांनी मंत्री महोदय छगन भुजबळ यांचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पाटोदा या गावाला 38 गाव योजनेचे पाणी कोणत्या ठिकाणाहून सोडणे सोयीस्कर होईल याबाबत सर्व्हे करून तात्काळ 38 गाव योजनेचे पाणी जोडण्यात संदर्भात सूचना प्रशासनाला केल्या. सोबतच ठाणगाव कानडी या गावांना धूळगाव 16 गाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मा ना छगन भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या
सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, 38 गाव पाणी योजना उपाध्यक्ष मोहन शेलार,कार्यकारी अभियंता जी पी निवडूंगे, निफाड उपअभियंता संदीप शिंदे, येवला उपअभियंता अनिल गर्जे आदी उपस्थित होते
पाटोदा हे 12 हजार लोकसंख्या असलेले येवला तालुक्यातील मोठे गाव आहे. गावात मोठी बाजारपेठ, शाळा कॉलेज आहे. गावात ग्रामपंचायत माध्यमातून विहिरीचे पाणी पुरवठा केला जातो. येवला 38 गाव, राजापूर 46 गाव, धुळगाव 16 गाव या पाणी योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात, गावातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचावे हे मा ना भुजबळ साहेबांचे स्वप्न आहे. मा ना छगन भुजबळ यांचे माध्यमातून पाटोदा गावाला लवकरच 38 गाव पाणी पुरवठा योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.
डॉ मोहन शेलार
उपाध्यक्ष 38 गाव पाणी पुरवठा योजना