येवला पंचायत समिती निवडणूक गट आरक्षण सोडत जाहीर;
येवला न्यूज प्रेस
येवला पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण सोडत आज (दिनांक 13/10/2025) जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमुळे अनेक गटांमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, काही महत्त्वाचे गट महिलांसाठी आणि मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
येवला पंचायत समितीच्या दहा गणांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे
पाटोदा ना. मा. प्र. (महिला) |
धुळगाव सर्वसाधारण ,
सावरगाव सर्वसाधारण ,
नगरसूल | ना. मा. प्र. ,
राजापूर सर्वसाधारन (महिला) ,
गवंडगाव अनुसूचित जाती ,
अंदरसूल सर्वसाधारण (महिला) ,
उंदिरवाडी सर्वसाधारण (महिला) ,
|निमगाव मढ सर्वसाधारण
मुखेड अनुसूचित जमाती (महिला)
* महिलांसाठी आरक्षित गट: पाटोदा (ना.मा.प्र.), राजापूर (सर्वसाधारण), अंदरसूल (सर्वसाधारण), उंदिरवाडी (सर्वसाधारण), आणि मुखेड (अनुसूचित जमाती) असे एकूण पाच गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
अनुसूचित जाती/जमाती: गवंडगाव अनुसूचित जातीसाठी, तर मुखेड अनुसूचित जमाती (महिला) यासाठी आरक्षित झाला आहे.
खुले गट: धुळगाव, सावरगाव आणि निमगाव मढ हे तीन गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुले) आरक्षित झाले आहेत.
या आरक्षण सोडतीमुळे आता इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार असून, सर्व राजकीय पक्षांच्या वतीने गटनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू होईल. ही सोडत चिठ्ठी काढून करण्यात आली, ज्यात आदेश सोमनाथ गुजरे (वय 13 वर्ष) या मुलाने चिठ्ठी काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली.