रोबोटिक्स,ऑटोमेशन क्षेत्रात संशोधनासाठी मोठ्या संधी

 रोबोटिक्स,ऑटोमेशन क्षेत्रात संशोधनासाठी मोठ्या संधी

प्राचार्य डॉ. देवकर : एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबोटिक्स ऍण्ड मेकॅट्रॉनिक्स कार्यशाळा
येवला :  
बाभूळगाव : एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबोट विषयी राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे संचालक रुपेश दराडे प्राचार्य डॉ.डी.एम.यादव व विभाग प्रमुख.

रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात संशोधनासाठी भरपूर संधी आहेत. तंत्रज्ञान वेगाने प्रगती करत आहे.प्राध्यापकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतानाच भावी अभियंत्यांना देखील त्याचा लाभ मिळवून द्यावा असे प्रतीपादन पुणे येथील शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देवकर यांनी केले.
बाभुळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या
एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र व  एआयसीटीई अटल मार्फत रोल ऑफ रोबोटिक्स ऍण्ड मेकॅट्रॉनिक्स ईन इंडस्ट्री यावर सहा दिवसीय एआयसीटीई   डेव्हलपमेंट ऑनलाईन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाला.यावेळी देशभरातून सहभागी २५० हुन अधिक प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना श्री. देवकर बोलत होते.
यावेळी संस्थेचे संचालक रुपेश दराडे,प्राचार्य डॉ. डी.एम.यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्राचार्य डॉ. यादव म्हणाले कि, औद्योगिक प्रक्रिया, डेटा हाताळणी आणि ग्राहक सेवा यांसारख्या क्षेत्रात मानवी कार्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांची जागा घेण्यासाठी रोबोट्स आणि स्वयंचलित प्रणालींचा वापर वाढत आहे. त्यामुळे संशोधनास खूप वाव असल्याने प्राध्यापक- विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा.
सहा दिवसात विविध नामवंत तज्ञांचे तेरा ऑनलाईन सत्र झाले.यात डॉ हितेश ठाकूरे यांनी रिसेन्ट ट्रेण्ड्स एन ऑटोमोबाईल ऍण्ड  रोबोटिक्स,प्रतीक काकडे यांनी सीएई ऍण्ड व्हर्चुअल टेस्टिंग, प्रणव लाड यांनी रोबोटिक्स प्रोग्रामिंग, कल्पेश पाटील यांनी रोबोटिक्स सिस्टीम,डॉ.ए.डी. विखर यांनी रोबोट कम्युनिकेशन प्रोटोकॉल,डॉ.किरण भोळे यांनी रिसेन्ट अड्वान्सेस इन अडेटिव्ह मॅनुफॅक्टरइजिंग,डॉ.पी.एम.सोळंखी यांनी पीएलसी सिस्टिम,डॉ.ए.डी.बागुल यांनी इंटरफेस रोबोट- पीएलसी रोबोटिक्स अप्लिकेशन,आनंद बंग यांनी एआय इन रोबोट्स, विकी वखरे यांनी रोबोट ऑटोमेशन, डॉ.सुनील कदम यांनी इंडस्ट्री ४. ० आणि सचिन पाटील यांनी ऑप्टिमिझेशन ऑफ इंडस्ट्रियल रोबोट या विषयावर मार्गदर्शन केले. या सर्व व्याख्यानांचा देशभरातील सहभागी प्राध्यापकांनी लाभ घेतला.   



शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.संदीप येवले,अधिष्ठाता डॉ.डी.पी.क्षीरसागर व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.समन्वयक म्हणून मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.एच.यू.पवार व मेकॅट्रॉनिक्स  विभागप्रमुख डॉ.एच.एस.राणे यांनी काम पाहिले.विद्यार्थी विकास अधिष्ठाता डॉ.ए.बी. भाने,प्रा.टी.व्ही.गुजराथी,प्रा.एच.आर.आहेर,प्रा. एस. जी. सावंत,प्रा. पी.आर. गोरे यांनी   आयोजन केले.संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे,संचालक रुपेश दराडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने