नगरसूल येथे झालेल्या हाणामारीत बाळू पैठणकर यांचा मृत्यू

येवला तालुक्यातील नगरसूल येथे किरकोळ कारणावरून आज दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीत बाळू पैठणकर यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. खुनाप्रकरणी तिघांना येवला तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.


धनामाळी मळा येथील बाळू रावजी पैठणकर यांच्या घरासमोर आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांचे भाऊबंद असलेल्या तुळशीराम लक्ष्मण पैठणकर यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातून लाठ्याकाठ्या व गजांनी केलेल्या मारहाणीत बाळू (५५) व त्यांचा मुलगा अनिल (३०) हे गंभीर जखमी झाले. नगरसूल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी चार वाजता बाळू यांचा मृत्यू झाला तर अनिलची प्रकृती चिंताजनक आहे. आशाबाई बाळू पैठणकर यांच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात तुळशीराम पैठणकर, त्यांचे भाऊ कैलास, शरद व पत्नी सुनीता यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने