खामगाव पाटी येथे मोकट कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण जखमी

आधीच जखमी असलेल्या हरणाला पाठलाग करीत कुत्र्यांनी आणखी जखमी करण्याचा प्रकार आज पहाटे तालुक्यातील खामगाव पाटी येथे घडला. पाय तुटलेल्या जखमी हरणाला अखेर ग्रामस्थांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवत जीवदान दिले आहे.
तालुक्यातील खामगाव पाटी परिसरात आज पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास काही कुत्रे जखमी हरणाच्या पाठी लागले. आधीच पाय तुटलेला असताना हरणाला पळता येत नव्हते. कुत्र्यांनी जखमी हरणाला आणखीनच चहुबाजूंनी चावे घेतले. सामाजिक कार्यकर्ते पौलस आहिरे यांच्या वस्तीजवळ घडलेल्या घटनेत आहिरे यांच्यासह वस्तीवरील ग्रामस्थांनी लाठ्या काठ्या घेत कुत्र्यांच्या तावडीतून जखमी हरणाची सुटका केली. पौलस आहिरे जखमी हरणाची घटना निवासी नायब तहसीलदार शरद घोरपडे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. घोरपडे यांनी घटनेची माहिती वनविभागाला कळवा असे सामाजिक कार्यकर्ते पौलस आहिरे यांना सांगितले. वन विभागाच्या अधिकार्‍यांना आहिरे यांनी कळविले असता वनविभागाचे कर्मचारी ३ तासांनंतर घटनास्थळी हजर झाले. तोपर्यंत जखमी हरणाला आहिरे यांनी आपल्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये आणून त्यास पाणी पाजले अन् चारा खाऊ घातला. वन विभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी दुचाकीवर आले, पण हरीण मोठे आहे असे बघून जखमी हरणाला उपचार करण्यासाठी डोंगरगाव येथून खासगी वाहन बोलाविले. अखेर या खासगी वाहनातून जखमी हरणाला नेण्यात येऊन डोंगरगाव येथील नर्सिंग होममध्ये भारम येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना पाचारण करून उपचार करण्यात आले.थोडे नवीन जरा जुने