येवला-कोपरगाव रस्त्यावरील बुधवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि स्कॉर्पिओच्या अपघातात एक जण ठार झाला आहे. स्कॉर्पिओने (एमएच 15-1234) शिर्डीकडून मनमाडकडे जात असताना या गाडीची कंटेनरशी जोडदार धडक झाली. त्यात करण रवींद्र चव्हाण (वय 20) हा जागीच ठार झाला, रवींद्र विजयसिंह ठाकूर, अनिल जयवंत आहेर, लकी जयवंत आहेर, फिरोज इफ्तियाच शेख या गंभीर जखमींवर येवला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.