ब्यूटीशियन काळाची गरज--------- डॉ.प्रज्ञा वेदांत

येवल्यातील शिंपी गल्लीतील प्रसिध्द अंबिका ब्यूटी पार्लर तर्फे तरूणींच्या चेहऱ्याच्या विविध समस्यासंदर्भात मुंबई येथील प्रसिध्द टीव्ही मेकअप ब्यूटीशियन डॉ.प्रज्ञा वेदांत यांचे सेमिनार घेणेत आले. गणपती पूजन आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ब्यूटीशियन डॉ.प्रज्ञा वेदांत यांचा सौ.कल्पना कुक्कर व सौ.देवता खांगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ब्यूटिशियन ही काळाची गरज असल्याचे मत प्रमुख पाहुण्यानी व्यक्त केले. सदर कार्यक्रम सौ.निलम कुक्कर यांनी आयोजित केला होता. ह्य कार्यक्रमास येवला,मनमाड,लासलगांव, मुखेड,कोपरगाव आदि ठिकाणावरून भगिनीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी पूनम पेटकर,शोभा पेटकर,प्रिया बाकळे,माया टोणपे,तोरल पटेल,सौ.पौर्णिमा करवा आदिनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने