मोटर चालू करण्याच्या वादातून सासऱ्याने सुनेला केली बेदम मारहाण....
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.... मारहाण करणाऱ्या सासऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
येवला
तालुक्यातील ममदापूर येथे पाण्याची मोटर सुरू करण्याहून झालेल्या वादामध्ये सासऱ्याने आपल्या सुनेलाच काठीने बेदम मारहाण केली असून सासऱ्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बबन किसन गुडघे असे सासऱ्याचे नाव असून मनीषा दत्तू गुडघे मारहाण झालेल्या सुनेचे नाव आहे या मारहाणीचा व्हिडिओ मनीषा गुडघे यांच्या मुलाने शूट केला असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मारहाण करणाऱ्या सासरा विरोधात संताप व्यक्त होत आहे दरम्यान येवला तालुका पोलिसात बबन किसन गुडघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई येवला तालुका पोलीस करत आहेत.


