कांद्यावर औषध फवारणी करताना ब्लोर मशीनच्या पंख्यात महिलेचे केस अडकून अपघात....
येवला तालुक्यातील कातरणी येथे माधुरी दीपक सोनवणे या महिलेचे डोके फवारणी पंपाच्या पंख्यात अडकल्याने जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यावर कुटुंबीयांनी तातडीने मनमाड येथे उपचाराला नेले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणले असता सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे समजले.
कांद्यावर औषध फवारणी प्रसंगी ब्लोर मशीनच्या टाकीमध्ये पाणी भरत असताना महिलेचे केस पंख्यामध्ये अडकल्याने हा अपघात झाला आहे.

