राजेंच्या' नावाला जागले...संभाजीराजे
पवारांकडून छत्रपती शिवरायांच्या वारशाची जपणूक
बेल्जियमच्या एकट्या पडलेल्या महिलेला तातडीची मदत;
येवल्यातून मानवतेचा आणि महिला सन्मानाचा अलौकिक संदेश.
येवला तालुक्यातील राजकारणात ज्यांना प्रेमाने 'राजे' म्हणून संबोधले जाते, त्या शिवसेनेचे नेते संभाजीराजे पवार यांनी केवळ आपल्या नावातील 'राजे' या शब्दालाच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या महिला सन्मानाचा आणि परस्त्री मातेसमान मानण्याचा महान वारसा प्रत्यक्ष कृतीने जपला आहे. सावरगाव येथे बेल्जियमची एक परदेशी महिला एकटी पडली असताना, संभाजीराजे पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवदूताप्रमाणे धाव घेतली आणि 'अतिथी देवो भव' या भारतीय संस्कृतीचा आदर्श जगासमोर ठेवला.
बस चुकली, पण माणुसकी मिळाली:
बेल्जियमची रहिवासी असलेली अॅस्टर नावाची महिला भारत भ्रमंतीवर असताना, सावरगाव परिसरात तिची बस चुकली. अनोळखी प्रदेश, भाषेचा मोठा अडथळा आणि एकटेपणामुळे ती अत्यंत हतबल झाली होती. आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर असताना आलेले हे संकट मोठे होते.
मात्र, याच वेळी मदतीसाठी धावून आले ते संभाजीराजे पवार. एकीकडे विदेशी पर्यटकांना लुबाडण्याचे किंवा महिला पर्यटकांची छेडछाड होण्याचे प्रकार घडत असताना, संभाजीराजे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मदत केली. त्यांनी स्वतःच्या कारने अॅस्टर महिलेला तिच्या पुढच्या प्रवासासाठी सुरक्षितपणे, तिच्या बसपर्यंत पोहोचवले. या मदतीत त्यांनी तिला भावनिक आधार दिला आणि तिच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली.
वारसा कृतीतून जपला:
या कृतीतून संभाजीराजे पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महिला सन्मानाचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला. त्यांचे सहकारी रामदास गोविंद, नवनाथ काटे, अमोल काकड, शरद पवार, बाळासाहेब पवार, गोरख बार्शिले, सचिन घोडेराव तसेच इतर गावकऱ्यांनीही या मदतीत सक्रिय सहभाग घेत 'अतिथी देवो भव' या वचनाचा आदर्श जपला.


