सुरुंगाच्या स्फोटात महिला ठार

कुसूर येथे शेतातील विहिरीचे खोदकाम करीत असताना सुरुंगाच्या स्फोटात दगड उडून डोक्याला मार लागल्याने एक महिला ठार झाली आहे. तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कुसूर येथे शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. सुरुंगाने विहिरीत स्फोट करीत असताना विहिरीपासून सुमारे ४०० फूट अंतरावर बसलेल्या सरूबाई लहानू सोनवणे (३२) या महिलेच्या डोक्यात विहिरीतून उडालेला दगड लागला. या दगडाने सरूवाई सोनवणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. ग्रामीण रुग्णालय या महिलेला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी यावेळी मृत घोषित केले. सदरची मृत महिला तालुक्यातील विसापूर येथील असून कुसूर येथे या महिलेची शेतजमीन होती. स्वत:च्या विहिरीचे खोदकाम करीत असतानाच ही घटना घडल्याने कुसूर व विसापूर गावावर शोककळा पसरली आहे. विसापूर येथे शवविच्छेदनानंतर सदर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल बागूल अधिक तपास करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने