स्वामी मुक्तानंद विद्यालयात 1 फेब्रुवारीस सत्संग सोहळ्याचेआयोजन

येवला  - प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सत्संग आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील पारेगाव रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सेवेकर्‍यांची तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत श्री दत्तात्रय जाधव व राजेंद्र चिनगी यांनी मार्गदर्शन केले. ही सेवा समस्त तालुकावासीयांसाठी असल्याने सर्वानी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सेव केंद्रातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुक्यातील समस्त स्त्री-पुरुष सेवेकरी कार्यरत आहेत, तसेच येवला-कोपरगाव रस्त्यावर होणारे वाढते अपघाताचे प्रमाण टाळावेत व मृतात्म्यांना सद्गती लाभावी म्हणून गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने शुक्रवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता म्हसोबा मंदिराजवळ महामृत्यंजय यंत्राची स्थापना व सोळा लक्ष महामृत्यूंजय मंत्राचा जप सेवेकर्‍यांतर्फे केला जाणार आहे.
थोडे नवीन जरा जुने