अलका भड मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

येवला, दि. 31 - धामोडे (ता. येवला) येथील नवनाथ चंद्रभान भड व मुलगा सुदर्शन या दोघा पिता-पुत्रांनी अलकाबाई भड हिचा शारीरिक व मानसिक छळ करून मारून टाकले, असा तक्रार अर्ज मयत अलकाबाईचा भाऊ बाळासाहेब सुकदेव येवले (रा. चिंचोडी, ता. येवला) यांनी तालुका पोलिसांत दिला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही येवले यांनी तक्रार अर्जात केली आहे.

अलकाबाई मयत झाल्याची माहिती दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता प्रकाश ज्ञानेदेव कोल्हे (रा. हडप सावरगाव) यांनी परस्पर आम्हाला दिली. त्यानंतर मी व सहकारी धामोडे येथे गेलो असता भड कंपनीने आपणास शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही बहिणीचा मृतदेह येवला ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन केले. त्यानंतर अंत्यविधीसाठी धामोडे येथे गेलो असता पती नवनाथ व मुलगा सुदर्शन हे दोघेही अंत्यविधीसाठी हजर नव्हते. दोघेही पोलीस गाडीत फिरत होते.

कदाचित आपणच सदर आरोपींना संरक्षण म्हणून बाहेर घेऊन गेले. याप्रकरणी पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी विनवणीही केली; मात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही. याबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आपल्या ताब्यातील आरोपींना अटक करावी, अशी मागणी पो.नि. सुरेंद्र शिरसाठ यांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.
थोडे नवीन जरा जुने