येवला-विंचूर रस्त्यावर अपघातात एक ठार; दोन गंभीर

येवला, दि. 31  - येवला-विंचूर रोडवर अंगणगाव शिवारात इंडिका कार, मोटारसायकल आणि सायकल यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, तर दोन जण जखमी झाले आहेत.

अंगणगाव शिवारात आज रात्री आठच्या दरम्यान नाशिकहून औरंगाबादकडे जाणारी इंडिका कार आणि अंगणगाव शिवारातून येवल्याकडे येणारी मोटारसायकल (एमएच 15 डीसी 3932) यांच्यात अपघात झाला. इंडिगो कारने मागून कट मारल्याने दुचाकीवरील मोहन वाघ (वन विभाग कर्मचारी) यांच्या डोक्याला जबर मुका मार लागला. त्यांना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी संगीता वाघ या जखमी झाल्या आहेत. या दरम्यान पारेगाव येथील अण्णा शिवाजी गांगुर्डे हे आपल्या सायकलवरून येवल्याकडे येत असताना त्यांनाही कारची धडक बसली त्यात गांगुर्डे यांनाही जबर दुखापत झाली. दोघा जखमींवर येवला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर इंडिगो कारचा चालक फरार झाला. त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
थोडे नवीन जरा जुने