नगरसूल येथील विवाहीतेवर सामुहिक बलात्कार.... आरोपी मध्ये राजकिय पुढारी ?

येवला -  येवला तालुक्यातील नगरसूल येथील एका विवाहीतेने आपल्यावर ३ महिन्यापुर्वी ३ इसमांनी सामुहीक बलात्कार केल्याची फिर्याद  येवला तालुका पोलिस स्टेशन येथे दाखल केलेली आहे.
बलात्कारानंतर आरोपी व इतरांनी पीडीत महिलेला फोन व इतरप्रकारे त्रास दिला. घरगुती वाद मिटवून द्यावा म्हणून सदर महिला या राजकिय नेत्याकडे गली असता तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आपल्याला नगरसूल येथील ग्रामिण रुगणालयातून येवला येथील एका लॉजवर नेऊन तीघांनी बतात्कार केला असे पीडीत महिलेचे म्हणणे आहे . याबाबत एक महिन्यापुर्वी सदर महिला येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेली असता मी त्यांना समजून सांगतो असे सांगून एका ढेकले नांवाच्या कॉनस्टेबल ने तीची बोळवण केली. त्यामुळे व आरोपीचे राजकिय वजन पाहून पीडीत महिलेने थेट पोलिस अधिक्षक पडवळ यांची नाशिक येथे भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर रातोरात पोलिस आयुक्तांनी स्वतः येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये हजर राहून तपासयंत्रणा कामाला लावली. बुधवारी रात्री ९.५० ला सीआर २८ या क्रमांकाने ३७६ २ग, ५०४,५३४,३६६ या भा.दं.वि कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील एक आरोपी सोनू गंडाळ याला अटक करण्यात आली आहे. उर्वरीत दोन आरोपी प्रमोद पाटील व किरण तांडगे फरार आहेत. महिलेची तक्रार घेणेस टाळणारे कॉन्स्टेबल ची चौकशी चालू असल्याचे पोलिस उपअधिक्षक सुनिल कडासने यांनी सांगीतले आहे.या प्रकरणात आरोपीमध्ये तालुक्यातील सक्रिय राजकारणी इंदिरा कॉग्रेसचे पदाधिकारी प्रमोद पाटील यांचे नाव आल्याने  खळबळ उडाली आहे. तर हे प्रकरण राजकिय हेतूने प्रेरित असल्याचे आरोपीच्या नातेवाईकाचे मत आहे. याबाबत महिला पोलिस अधिकारी अजून तपास करीत आहे
थोडे नवीन जरा जुने