बारावीच्या तोंडी परीक्षांवर बहिष्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बैठकीत इशारा

येवला -  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष के. एन. आहिरे यांनी
दिला.
येथील स्वामी मुक्तानंद महाविद्यालयात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कर्मचार्‍यांची बैठक जिल्हाध्यक्ष आहिरे, उपाध्यक्ष अनिल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्याप्रसंगी आहिरे बोलत होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाविरोधात संघटनेचा लढा नाही. विद्यार्थी, पालक व संस्थाच्याही विरोधात आम्ही नाही. शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने शासनाशीच आमचा लढा असल्याचे स्पष्ट करून जिल्हाध्यक्ष आहिरे म्हणाले, संघटनेने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली मात्र आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच बहिष्काराचे अस्त्र काढले आहे.
संघटनेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न संस्थाचालकांनी केल्यास संस्थाचालकांच्या घरावरही मोर्चा काढण्याचा इशारा आहिरे यांनी दिला. प्रास्ताविक उपप्राचार्य सी.ए. दुकळे यांनी केले. बैठकीस तालुकाध्यक्ष एस.बी. देवरे, प्रा. व्ही.ओ. पाटील, प्रा. एस.एस. आव्हाड, प्रा. के. एन. धनवटे, प्रा. बी.एस. पैठणकर, प्रा. आर.व्ही. सोनवणे, प्रा. गणेश हारके, प्रा. बाळासाहेब हिरे आदिंसह अनुदानित, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. 

 संघटनेच्या मागण्या
सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी
१ जानेवारी ९६ पासून लागू करण्यात यावी.
कायम विनाअनुदानित तत्त्व रद्द करून त्वरित अनुदान द्यावे
सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी व ग्रेड पे द्यावे
२00८-0९ पासूनच्या ११६६ वाढीव पदांना त्वरित मान्यता देण्यात यावी
४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा करण्यात याव्यात
विनाअनुदान काळातील सेवा वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी
विद्यार्थी हितासाठी विज्ञान विषयाची लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणे प्रत्येक विषयासाठी दोन स्वतंत्र पेपर घेण्यात यावे
प्रात्यक्षिक परीक्षांसाठी पूर्वीप्रमाणेच बाह्य परीक्षक नेमले जावेत
सेवानवृत्ती वय ६0 वर्षे करण्यात यावे
२४ वर्षे सेवा झालेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी देण्यात यावी
कनिष्ट महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करण्यात
थोडे नवीन जरा जुने