धडपड मंच आयोजित मेहंदी स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक


येवला-संक्रांतनिमित्त येथील धडपड मंचतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही महिलांकरिता मेहंदी स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा येवला मर्चट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात मोठय़ा उत्साहात पार पडली. यात 15 वर्षाच्या आतील व 15 वर्षाचे वरील असे दोन गट करण्यात आले होते. दोन्ही गट मिळून एकूण 206 स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रत्येक स्पर्धकास एक मेहंदीचे पुस्तक व तिळगूळचे वाटप करण्यात आले होते. तसेच मोठय़ा गटातील महिलांकरिता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून दान म्हणून कंगवे वाटण्यात आले.

लहान गटातील यशस्वी स्पर्धक अनुक्रमे असे: दीपश्री पावटेकर, गायत्री शिंदे, नम्रता वडे, शुभांगी कुमावत, धनश्री भांडगे, तर मोठय़ा गटातील यशस्वी स्पर्धक अनुक्रमे असे: प्रियंका मारवाडी, गायत्री जेजुरकर, ज्योती भोसले, पूजा काबरा, सायली पाटोदकर आदी आहेत. स्पध्रेचे परीक्षक म्हणून प्रीतीबाला पटेल, ललिता चंडालिया, माया टोपणे, सोनाली कुलकर्णी, डॉ.रुची खांगटे यांनी काम पाहिले. बी. के. बाफणा यांनी प्रास्ताविक केले. डॉ.खांगटे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाकर झळके, नईम मणियार, प्रभाकर आहिरे, मुकेश लचके, गोपाळ गुरगुडे, संतोष खंदारे, मंगेश रहाणे यांनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने