नवरा सासू सासरा दिर यांना ८ वर्षांची सक्तमजूरी....

येवला - तालुक्यातील नागडे येथील चार महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी निफाड सत्र न्यायालयाने सासरच्या चौघांना आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
नागडे येथील चार महिन्यांची गर्भवती विवाहिता रमा बाबासाहेब धिवर हिने छळास कंटाळून गावातील विहिरीत आत्महत्त्या केली. या प्रकरणी रमाची आई रेखाबाई महाले (रा. वाघोळा, ता. वैजापूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात रमाचा पती बाबासाहेब धिवर, सासरा प्रकाश धिवर, सासू लताबाई धिवर, दीर शरद धीवर, नणंद वैशाली झाल्टे व बाबासाहेब यांचा मावसभाऊ माणिक अहिरे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. शहर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास करताना सबळ पुरावे जमा करून येवला न्यायालयात खटला पाठविला. सदर खटला निफाड सत्र न्यायालयात वर्ग झाला असता सरकारी अभियोक्ता व्ही. डी. गवांदे यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. निफाड सत्र न्यायालयाने अहिरे व वैशाली यांना निर्दाेष ठरवत बाबासाहेब, प्रकाश, लता, शरद धिवर या चौघांना आठ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
थोडे नवीन जरा जुने