मुखेड शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा कोंडा तुटल्याने एक कामगार ठार

येवला तालुक्यातील मुखेड शिवारात विहिरीचे खोदकाम सुरू असताना ‘चारी’च्या माडीचा कोंडा तुटल्याने एक कामगार ठार झाला आहे.मुखेड शिवारात पांडुरंग दराडे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरूआहे. यावेळी चारीच्या माडीचा कोंडा तुटल्याने माडी डोक्यात पडून विहिरीत काम करणारे भाऊसाहेब वाघ (४0) ठार झाले. सदर घटना शनिवारी, दुपारच्या सुमारास घडली.
या प्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे
थोडे नवीन जरा जुने