कोटमगाव येथे श्री जगदंबा देवीचे मंदिरात चोरी; दागिने लंपास

येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवी मंदिरात आज
(मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील सुमारे ३
लाख ६० हजार रुपये किमतींच्या ६ किलो चांदीच्या ३ छत्र्या लंपास केल्या
असून, दोन दान पेट्यांची कुलुपे तोडून पेटयांमधील सुमारे लाख रुपयांची
रक्कमही पळविली आहे.कोटमगाव येथे श्री जगदंबा देवीचे पुरातन मंदिर आहे. पहाटे चार वाजेच्या
सुमारास या मंदिराच्या सभामंडपाच्या दक्षिण बाजूकडील खिडकीचे ग्रिल कापून अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून गाभा-यातील देवीच्या ६ किलो वजनाच्या ३ चांदीच्या छत्र्या लंपास केल्या. याबरोबरच मंदिरातील दोन दानपेट्याची कुलुपे तोडून दानपेट्यामधील रक्कमही चोरट्यांनी पळविली. सहा
वाजेच्या सुमारास रक्षकाने अशोक कुलकर्णी यांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी विश्वस्तांना कळविले.
दरम्यान घटनास्थळी तहसीलदार हरीश सोनार पोलिस निरीक्षक श्रावण सोनावणे यांनी भेट दिली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटे कैद झाले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने