येवला तालुक्यातील राजापूर येथील पाणीपुरवठा करणारी विहीर 12 
वर्षापासून चोरीला गेली असल्याची तक्रार उपसरपंच रामदास जाधव यांनी केली 
आहे.  राजापूर गावासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विहिरीचे काम
 करण्यात आले आहे. या विहिरीवरून गावासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. गट नं.
 492, 494, 493 यापैकी कोणत्या गटात विहीर आहे, हे कुणाला माहितच नाही. 
विहिरीची तलाठी दप्तारीही नोंद नाही. वीज कनेक्शन घेताना कोणत्या गटाचा 
सातबारा दिला, त्यावर विहिरीची नोंद आहे का? असल्यास आजपावेतो विहिरीची 
नोंद का नाही, बारा वर्षापासून विहिरीची नोंदच नाही, त्यामुळे वीज कनेक्शन 
दिले कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विहीर कोणत्या गटात आहे, 
त्याची नोंद व्हावी म्हणून उपसरपंच अधिकारी मूग गिळून आहे. पाणीपुरवठा कधी 
सुरू होतो, तर कधी बंद राहतो. त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. बारा 
वर्षापूर्वीच विहीर खोदाई झाली असून, विहिरीची नोंद नसल्याने सार्वजनिक 
पाणीपुरवठा करणारी विहिरच चोरी गेल्याची तक्रार रामदास जाधव यांनी केली 
आहे.