येवला-
नाशिक जिल्ह्यात प्रथम आय.एस.ओ. मानांकन मिळविलेल्या येवला येथील तहसील
कार्यालयात आता, सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तहसील कार्यालयातील कामकाजात
पारदर्शकता आणण्यासाठी येवला तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात
आले आहे.
सेतू विभागात आतील भागात १ व बाहेरील बाजूस १ तसेच निवासी नायब तहसीलदारांच्या डस्कसमोर तर सेतू प्रवेशद्वाराजवळ एक असे ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, या चारही कॅमेर्यांचे एकत्रित चित्रण तहसीलदार कक्षात व सेतू व्यवस्थापन कक्षात दिसते अशी व्यवस्था करण्यात आली आहे. येवला तहसील कार्यालय व सेतू विभागाबाबत नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता पारदर्शकतेबरोबरच गतिमान कामकाजासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यामुळे दिरंगाई, गैरप्रकार व गैरसमजही दूर होतील, असे तहसीलदार हरिश सोनार यांनी सांगितले.