अपंगत्वाचे दाखले तालुकास्तरावरच देण्यात यावेत - शेख मोमीन

येवला- अपंगत्वाचे दाखले तालुकास्तरावरच देण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी सेनेचे जिल्हाध्यक्ष शेख मोमीन यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. अपंगत्व दाखल्यांसाठी ग्रामीण भागातील अपंगांना नाशिक येथे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे जावे लागते. यात वेळ व पैसा खर्च होऊन त्रासही सहन करावा लागतो. सदर दाखले तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयातून मिळाल्यास अपंगांची मोठी सोय होणार असल्याचे मोमीन यांनी सदर निवेदनात म्हटले आहे.
थोडे नवीन जरा जुने