येवला, दि. 11 - अंगणगाव येथील बोटिंग क्लबला पाणी दिल्याने परिसरातील
विहिरींना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, तसेच औद्योगिक
वसाहतीमधील उद्योगांना वापराचे पाणी मिळत आहे. अंगणगाव ग्रामपंचायत
नियमितपणे सदर तलावातील पाणी भरून घेत आहे. त्यामुळे हकाटी पिटणार्यांनी
जनतेचे विषय समजून घ्यावे, अशी माहिती सोसायटीची माजी चेअरमन विठ्ठलराव
आठशेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यानच्या काळात तलावात पाणी नसल्याने व यावर्षी पावसाळ्यात पाणी न भरल्यामुळे विहिरींना पाणी आलेच नाही. पाण्याअभावी काही उद्योग बंद पडले. गावची लोकसंख्या वाढली आहे; मात्र टाकीची क्षमता मर्यादित आहे. पिण्यासाठी 38 गाव योजनेचे पाणी पुरत नाही. तळ्यात पाणी भरल्यामुळे परिसरातील शेतकर्यांच्या विहिरींना पाणी उतरून पिण्याच्या पाण्याची सोय झाली. पाण्यासारख्या प्रश्नावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून राजकारण करू नये, असे आठशेरे यांनी पत्रकात म्हटले आहे.