येवला- शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी कातरणी मुक्कामी बसचा मार्ग बदलून सदर
बस आडगाव रेपा पाटोदामार्गे करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण
विद्यार्थी सेनेच्या वतीने येवला आगारप्रमुखांकडे करण्यात आली आहे. कातरणी
मुक्कामी बस गेल्या पंधरा दिवसांपासून कानडी, ठाणगाव, सावरगावमार्गे येत
असल्याने आडगाव, कातरणी या भागातील शालेय विद्यार्थ्यांना एसटी बस
पासव्यतिरिक्त भाडे द्यावे लागते. शालेय विद्यार्थ्यांचा सुविधेसाठी सदर बस
आडगाव रेपाळ, पाटोदामार्गे करण्यात यावी, असे सदर निवेदनात म्हटले असून,
याप्रश्नी आंदोलन छेडण्याचा इशाराही शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर
पांडुरंग शेळके, योगेश गायकवाड, सुनील शिंदे, दीपक चौघुले,आदि
विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.