स्पर्धा परीक्षेत येवला महाविद्यालयाचे यश

येवला- जिज्ञासा राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत येवला कला व वाणिज्य महाविद्यालयाने धवल यश संपादन केले आहे. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळ महिला महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने सदर स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत महाविद्यालयाचे ज्ञानेश्‍वर शिंदे, अर्चना कदम, स्वप्नपाल शिंदे आदि विद्यार्थी तालुक्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत. तसेच मनमाड येथील इंटरलिनंट टेक्निकल अँड इंग्लिश स्पिकिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेत साजीद शेख, योगीता हगवणे, रोहिणी कदम या तीन विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले.
थोडे नवीन जरा जुने