कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची टंचाईग्रस्त गावांमध्ये जनजागृती

येवला येथील कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातील टंचाईग्रस्त चिंचोडी व अंगणगाव या गावांमध्ये जनजागृती अभियान राबविले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सूचनेनुसार सदर उपक्रम राबविण्यात आला. या गावांमध्ये प्रबोधन फेरी काढण्यात येऊन पथनाट्यांद्वारे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत प्रबोधन केले गेले. चिंचोडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. संगीता पवार होत्या. यावेळी उपसरपंच मच्छिंद्र मढवई, प्राचार्य आर. आर. कदम यांची प्रसंगोचित भाषणे झाली.
अंगणगाव येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी भाऊसाहेब गायकवाड, सुरेश परदेशी, प्राचार्य कदम यांची प्रसंगोचित भाषणे झाली. प्रास्ताविक जी. एस. पठाणे यांनी केले. नियोजन अतुल शिंदे यांनी केले, तर कु. टी.आर. पठाडे, सौ. एस. व्ही. निंबाळकर, एस. एस. धनगे, व्ही. डी. शिखरे, बी. पी. वाघचौरे यांनी मार्गदर्शन केले.
थोडे नवीन जरा जुने