येवला - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने येवले
शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी नागरिकांनी या
कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे
तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी व पदाधिकार्यांनी
केले आहे. शनिवारी (दि.३0) सकाळी ६ वाजता o्री. व सौ. अमित अनकाईकर, o्री व
सौ. राहुल लोणारी यांच्या हस्ते टिळक मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज
पुतळ्यास अभिषेक व पूजन केले जाईल. स. ८ वा. शिवसेनेचे ग्रामीण
जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख
उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. दि. ३ एप्रिल रोजी नाशिक जिल्हा
सेना केसरी व युवासेना केसरी कुस्ती दंगल दुपारी ४ वाजता पारेगाव
रस्त्यावरील भाऊ लाल पहिलवान क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
मिरवणुकीत सहभागी होणार्या प्रत्येक मंडळाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार
करण्यात येणार आहे.