येवला - येथील बसस्थानकावर सावरगाव (ता. येवला) येथील मच्छिंद्र
मारोतराव रौंदळ (वय ५५) यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आज
सायंकाळी ४ वाजता घडली. सावरगाव येथील मच्छिंद्र रौंदळ हे येवला येथे
आठवडे बाजारासाठी आले होते. बसस्थानकाजवळील रिक्षा स्टॅण्डजवळ रौंदळ यांना
फिट आली. त्यात ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णवाहिका
बोलावून ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ. जेजूरकर यांनी तपासणी केली असता मृत
झाल्याचे घोषित केले. ऐन सणासुदीच्या दिवशी दु:खद घटना घडल्याने सावरगाव
परिसरात शोककळा पसरली.