नागडे गावात नदीत बुडुन शाळकरी मुलाचा मृत्यू

येवला  - येवला शहरापासून जवळच असलेल्या नागडे गावालगतच्या नदीच्या डोहामध्ये १२ वर्षीय शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. नागडे येथील नदीच्या डोहात १२ वर्षीय सुफियान शब्बीर शेख रा. मिल्लतनगर, येवला ह्या शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला. याबाबत येवला शहर पोलिसात नागडे येथील संतोष विश्वनाथ जाधव याने खबर दिली अशी माहिती येवला शहर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ह. ठाकूर करीत आहे.
थोडे नवीन जरा जुने