राजापूरचा आठवडे बाजार दुपारनंतरच भरणार

येवला तालुक्यातील राजापूर येथे एप्रिल महिन्यापासून रविवारी आठवड्याचा बाजार दुपारी १२ वाजेनंतर भरणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक व सरपंच दत्तू दराडे यांनी एका पत्रकाद्वारे दिली. सध्या राजापूरचा बाजार सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भरत असल्याने जवळच असलेल्या गावाच्या लोकांना बजार मिळत नव्हता. त्यामुळे काही ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठराव करून बाजार दुपारनंतर भरवावा, असे सूचित केले होते. त्यावरून ग्रामपंचायतीने २७ मार्च रोजी बाजार जाहीर लिलाव करावयाचे ठरविले आहे. तसा सूचना फलक ग्रामपंचायत कार्यालयापुढे लावण्यात आला आहेत. या लिलावामध्ये घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांना भाग घेता येणार नाही. लिलावाचे डिपॉझिट रक्कम ५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या लिलावासाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी हजर रहावे,असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
थोडे नवीन जरा जुने