येवल्यात मोफत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

येवला - सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ए.टी.डी.सी व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय लोकांसाठी जापनीज शिलाई मशीनद्वारे मोफत फॅशन डिजाईनिंग प्रशिक्षण केंद्राचे उद््घाटन नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी रा.यु.काँ.शहाराध्यक्ष मुशरिफ शाह, नगरसेवक संजय कासार, येमको संचालक दिनेश आव्हाड, प्रदीप सोनवणे, वहाब शेख, गोविंदा शिंदे, मौलाना सकुर मुलतानी आदी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष अजहर शाह यांनी नागरिकांना योजनेचे फायदे व संस्थेचा उद्देश सांगितला. फॅशन डिझाईनर स्नेहल गायकवाड व माधुरी वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
थोडे नवीन जरा जुने