नगरसूलच्या नारायणगिरी आश्रमशाळेला प्रतीक्षा अनुदानाची

नगरसूल - आदिवासी आश्रमशाळांचे शासकीय अनुदान बंद असल्याने संस्थाचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील संतश्री नारायणगिरी निवासी आदिवासी शाळेलाही दोन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा आहे.नाशिक जिल्ह्यातील विविध आश्रमशाळेतील अनेक प्रकार समोर आल्याने सन २0१0-११ मध्ये संबंधित विभागाने एकूण ८२ च्या वर असलेल्या आदिवासी आश्रमशाळांची मान्यता संख्या २९ इतकी केली होती. अनेक आश्रमशाळेतील शाळेमध्ये निवासी आदिवासी मुलामुलींना राहण्यासाठी स्वतंत्र निवासस्थान, अंघोळीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्वतंत्र शौचालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वयंपाक गृह, क्रीडांगण, खेळणीचे साहित्य, सायंकाळचा विद्युतपुरवठा, अन्न-पाणीपुरवठा अशा अनेक प्रमुख गोष्टी उपलब्ध नसल्याने संपूर्ण राज्यात संबंधित विभागाकडून विशेष पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविण्यात आले. अनेक आश्रमशाळेत वरील गोष्टींचा अभाव असल्याचे उघडकीस आल्याने तडकाफडकी संबंधित आश्रमशाळांच्या मान्यता रद्द केल्या होत्या. त्यामध्ये काही शाळांना पुनर्जीवित करण्यासाठी संस्थाचालकांनी विशेष प्रय▪करुन मोठे भांडवल खर्च करून येथील संत श्री नारायणगिरी निवासी आदिवासी आश्रमशाळेत स्वतंत्र वर्ग खोल्या, स्वतंत्र निवास व्यवस्था (मुलामुलींसाठी विभक्त) यामध्ये मुलीच्या निवासस्थानात गेटच्या आत स्वतंत्र शौचालय, प्रयोगशाळा, ग्रंथालय, शालेय साहित्य, पाण्याची सुविधा, मुलां-मुलींसाठी साबन-तेल, अल्पोपहार, दोन वेळचे जेवण अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या; मात्र महाराष्ट्र शासन व संबंधित आदिवासी विकास मंडळाकडून गेल्या दोन वर्षांपासून शासकीय अनुदान बंद आहे, संबंधित विभागाकडून तत्काळ अनुदान देण्याची मागणी संस्थाचालकांकडून होत आहे.
थोडे नवीन जरा जुने