विजेच्या धक्क्याने कर्मचार्‍याचा मृत्यू

येवला - बाभुळगाव शिवारात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरु झाल्याने एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास बाभुळगाव शिवारात येवला ते नगरसूल मेनलाईन एसी स्वीच नादुरुस्त होता. पाटोदा रोडवरील पॉवर हाऊस येथून वायरमन मनोज आवटे यांनी वीज प्रवाह बंद केल्याचे फोनवरुन सांगितले. वीज कंपनीचे कर्मचारी योगेश साहेबराव गायकवाड (वय २३, रा. धामोडे, ता. येवला) हे विजेच्या खांबावर दुरुस्तीच्या कामासाठी चढले. सोबत असलेला दुसरा कर्मचारी सतिष धमाजी गायकवाड (वय ३५, रा. अनकुटे) हे दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी जवळच असलेल्या वस्तीवर गेले असता अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने योगेश गायकवाड यांना विजेचा धक्कालागून तो खाली पडला. त्याच्या डोक्यास चॅनल लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास निरीक्षक श्रावण सोनवणे, हवालदार बापू शिंदे, चेतन बागूल करीत आहेत
थोडे नवीन जरा जुने