येवल्यात क्षत्रिय समाज वधू-वर मेळावा संपन्न

येवला - येथे सोमवंशीय क्षत्रिय समाज वधू-वर परिचय मेळाव्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसिंगसा मेंगजी, तर प्रमुख अतिथी म्हणून जयंतराव पवार, बापुसा टाक, ज्ञानेश्‍वरसा कडतन, विलास कट्यारे उपस्थित होते. सदर मेळाव्यात सुरत, बर्‍हाणपूर, महेश्‍वर, इंदुर, उज्जैन, अहमदाबाद, नगर, पुणे, सोलापूर, हुबळी, वसमत, मानवत, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मुंबई, ठाणे आदि जिल्ह्यांतून ४00 विवाहइच्छुक मुले व शंभर मुलींनी सहभाग घेऊन नोंदणी केली. यानिमित्ताने संजीव सोनवणे यांचा ‘लग्नावर बोलू काही’ हा समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
थोडे नवीन जरा जुने