महात्मा फुले जलभुमी संधारण अभियानातून येवल्यात शेकडो हेक्टर नापिक जमिन सुपिक

नाशिक : पाण्याची मर्यादि उपलब्धता आणि वारंवार येणारी दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्यावर मात करण्यासाठी सतत टंचार्इचा सामना करणा-या येवला तालुक्यात या भागाचे लोकप्रतिनिधी आणि नाशिकचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या महात्मा फुले जलभुमी संधारण अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसांत सुमारे पाचशे एकर कातळ शेतजमीन नापिकची सुपिक झाली आहे.
कमी पाऊस आणि कमी पिक उत्पादन असणा-या तालुक्यांना राज्यसरकारने यंदा टंचाई कामांसाठी 75 लाख रू.चा निधी जलसंधारण उपाययोजनांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा विनियोग ना.भुजबळ यांच्या सुचनेनुसार येवला मतदार संघात पुरेपूर करण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे दोनशे लहान मोठी कामे सुरू आहेत. त्याचे दृश्य परिणाम आगामी काळात निश्चितपणे दिसू शकतील असा विश्वा ना.भुजबळ यांनी व्यक्त केला.
 महात्मा फुले जलभुमी संधारण अभियानांतर्गत येवला तालुक्यात अनेक गावांत हिरीरीने    लोकसहभागाद्वारे कामे सुरु आहेत. पारंपारिक मृद संधारण पध्दतीने 1 टीसीएम (1000 क्युबिक मीटर) पाणी अडवण्यासाठी सुमारे 75 ते 80 हजार रू खर्च येतो. तर शासनाच्या महात्मा फुले जलभुमी संधारण अभियानातून लोकसहभागामुळे हेच काम 10 ते 12 हजार रूपयात म्हणजे 8 ते 10 पट कमी खर्चात होत आहे. या उपक्रमात निघणा-या गाळावर रॉयल्टी लागत नाही, तो गाळ अथवा पोयटा शेतकरी स्वतः आपआपल्या शेतात टाकत आहेत.

गाळ काढण्यासाठी शासनामार्फत जेसीबीसाठी लागणा-या डिझेलचा खर्च दिला जातो. यामुळे कमी प्रतीच्या, खडकाळ शेतजमीनीची जलसंधारण क्षमता वाढत आहे. एक हेक्टर पडीक जमिनीवर ढोबळ मानाने सरासरी तीनशे ट्रॅक्टर गाळ बसतो. यामुळे या जमीनीत पाणी साठवण्याची क्षमता वाढते तसेच शेतजमीनीची सुपिकता वाढत आहे असे तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांनी सांगितले.
 व्या पाटबंधारे प्रकल्पासाठी लागणारे भुसंपादनही यामुळे टाळले जाते. या अभियानात गाळ काढणे , जुन्या बांधाची दुरूस्ती करणे , खोल सलग समतल चर खोदणे ,विहिर पुनर्भरण , गॅब्रीयल स्ट्रक्चर , वनरार्इ बंधारे इत्यादी कामे केली जात आहेत.
 या अभियानातून येवला तालुक्यात 140 ठिकाणी गाळ काढणे , पंधरा ठिकाणी फुट तूट दुरूस्ती, आठ ठिकाणी खोल सलग समतल चर तर 37 ठिकाणी विहिर पुनर्भरण अशी दोनशे कामे प्रस्तावित आहेत. सद्यस्थितीत 5 लाख 28 हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला असून 3 कोटी 65 लाख रूपये मुल्याचे काम झाले आहे. यामुळे 365 हेक्टर क्षेत्र सुधारले असून गाळ काढल्यामुळे 540 हजार घनमीटर टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे सुमारे दोनशे हेक्टर सिंचन क्षेत्र वाढले आहे. अडवलेल्या पाण्याचे मुल्य सुमारे 4 कोटी 10 लाख रू.असेल असे तालुका कृषी अधिकारी यांनी ना. छगन भुजबळ यांना सांगितले.
 तालुक्यात पंधरा जुन्या उपचारांची दुरूस्ती करण्यात आली असून 19 लाख रू खर्च दुरूस्ती कामांवर झाला आहे. 160 टीसीएम पाणी साठा दुरूस्तीमुळे वाढला आहे तर 160 हेक्टर सिंचन क्षमता वाढली आहे. आतापर्यंत येवला तालुक्यात एकूण 58 लाख 60 हजार रू खर्च झाला असून 525 हेक्टर क्षेत्र सुधारले आहे त्यामुळे 700 टीसीएम पाणी अडवले जाणार असून 4 कोटी 93 लाख रूपयाची कामे झाली आहेत.
भुजबळ फाऊंडेशनच्या वतीने दुष्काळ निवारणार्थ सुरू असलेल्या पाणी अडवा , पाणी जिरवा मोहीमेतून येवला तालुक्यातील जळगांव नेऊर येथील 28 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे साडेतीन कोटी लिटर पाण्याची क्षमता वाढली आहे. यामुळे परिसरातील दहा गावांना लाभ होणार आहे.
थोडे नवीन जरा जुने