पाणीप्रश्नी सोमठाण जोश येथे शनिवारी रास्ता रोको

येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, सुरू असलेले पाण्याचा टँकर वेळेवर येत नसल्याने शनिवारी (दि. ६) रोजी सोमठाण जोश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनास राजापूर शिवसेनेच्या वतीने पाठिंबा व्यक्त करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अशोक आव्हाड यांनी दिली. सोमठाण जोश येथे दरवर्षी टँकरने उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. येथे कयमस्वरूपी पाणीपुरवठा योजना नाही. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने तीन विहिरी घेतल्या असून, त्यापैकी मावलाई व नवादा येथील विहिरींना पाणी आहे. पाईपलाईन नसल्याने गावाला पाणीपुरवठा होत नाही. हनुमाननगर गावासाठी दररोज टँकरने पाणीपुरवठा व्हावा, अन्यथा ६ एप्रिल रोजी रस्ता रोकोचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला. निवेदनावर लक्ष्मण तांबे, रामेवर चवंडगीर, एकनाथ सदगीर, दौलत राठोड, गुलाब चंवडगीर, शिवाजी चंवडगीर, काशीनाथ पवार, जनार्दन आगवण, गोरख राठोड, समाधान आगवण, रवींद्र पवार, ज्ञानेश्‍वर राठोड, नवनाथ चव्हाण आदींच्या सहय़ा आहेत.
थोडे नवीन जरा जुने