शिवराज्य ग्रुपतर्फे शिवरायांना अभिवादन

येवला  - शिवजयंती उत्सवानिमित्ताने येथील शिवराज्य ग्रुपच्या वतीने फत्तेबुरूज नाका येथे जानकीदास महाराज वैष्णव यांचा शिवचरित्रावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. o्री जानकीदास यांनी आपल्या तेजस्वी वक्तव्याने शिवचरित्रच्या इतिहास प्रत्यक्षात उतरविला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष नीलेश पटेल, शिवसेनेचे राजेंद्र लोणारी, पंचायत समिती सदस्य संभाजी पवार, बंडू क्षीरसागर, पो.नि. श्रावण सोनवणे, भूषण शिनकर आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवस्वराज्य ग्रुपचे सचिन कोटमे, शंकर शेळके, गोकुळ करमासे, चेतन देशमुख, हर्षद लोचके, मयूर सोनवणे, जयवंत कोटमे, राजेंद्र आडणे आदींनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने