येवला - मोटार सायकल चोरीच्या घटनेत सातत्य असून शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये मिटींग साठी आलेल्या अरुण रामदास पाटील या शिक्षकाची मोटार सायकल चोरीला गेली आहे. MH-15BQ 1222 या नंबरची बजाज डिस्कव्हर मॉडेलची मोटार सायकल मिटींगला आलेल्या पाटील या शिक्षकाने विद्यालयाच्या आवारात उभी केली होती मिटींग संपल्यावर ३ वाजता आपली मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्याला आढळून आले. ही चोरी दुपारी ११ ते ३ च्या दरम्यान झाल्याचा संशय असून याबाबत येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो.ह. उंबरे याबाबत तपास करीत आहे.
स्वामी मुक्तानंद विद्यालातून मोटार सायकल गेली चोरीला,,,,,,,,,,,,,,,
byन्यूजप्रेस
-
0