येवला - ममदापूर बसला अपघात...........

येवला- येवला बस डेपोच्या येवला-ममदापूर या कोळगांव मार्गे जाणाऱ्या बसला एका मोटारसायकल स्वाराला चुकविण्याच्या नादात आज अपघात झाला. या बाबत सविस्तर वृत्त असे कि येवल्याहून ममदापूरला जाणारी बस कोळगावजवळ आली असताना समोरून भरघाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल स्वाराला चुकविताना बस शेजारील नालीत पलटी झाली. मोटर सायकल स्वार हा बसच्या टाकीला धडकला. त्यामुळे बसचे प्रवासी व वाहक व चालक किरकोळ जखमी झाले.पवार नावाचा चालक यात जखमी झाला आहे. बसमधील प्रवासी ममदापूर व कोळगाव येथील होते. याबाबत येवला तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो.कॉ. आवारे तपास करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने