टँकर व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार

येवला - येवला-मनमाड रस्त्यावर कासारखेडे शिवारातील न्यू पंजाब ढाब्याजवळ टँकर व वाळूचा डंपर यांच्यात झालेल्या अपघातात डंपरचा क्लिनर गजानन मुरलीधर सोनवणे येसगाव, ता. कोपरगाव, जि.नगर) हा मृत पावला. डंपर (क्र. एमएच १७-एजे ४0७७) हा रस्त्याच्या कडेला उभा असताना त्याला पाठी मागून मनमाडकडे जाणार्‍या टँकरने (क्र. एचएच १९ झेड १३४१) जोरदार धडक दिली. त्यामुळे डंपर उलटला व क्लिनर गजानन सोनवणे हा दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला येवला येथील  ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातानंतर चालक टँकर सोडून पळून गेला. याबाबत डंपरचे चालक भरत भास्कर देशमुख यांनी चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
थोडे नवीन जरा जुने