हायकोर्ट वकिलाच्या दक्षतेने खोटे सोने विकणारी टोळी गजाआड

येवला - खोदकाम करताना सापडलेले दोन किलो सोने अध्र्या किंमतीत देतो म्हणून मुंबई हायकोर्टातील वकील विवेकानंद नारायण उपाध्ये यांना फसविणार्‍या तिघांविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन भालचंद्र सोनवणे (वय २२, रा. सटाणा), घनश्याम कांताबाई रोहि त (वय २६, रा. गुजराथ) व साहिल मोरे हे तिघे मुंबई येथे रूम पार्टनर आहेत. त्यांनी बदलापूर येथील अँड़ विवेकानंद उपाध्ये यांना सांगितले की, आम्हाला खोदकाम करीत असताना सोने सापडले, ते तुम्हाला अध्र्या किंमतीत देतो. त्या तिघांमधील साहिल हा मुंबईत ब्रोकरचे काम करतो. त्यानुसार या वकिलाला फसविण्याचा प्लॅन केला.  प्रथम अँड़ विवेकानंद उपाध्ये यांनी ५ हजार रुपये देऊन सोन्याचा नमुना खरेदी केला. सदरचे सोने नकली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतरांची फसवणूक होऊ नये, म्हणून उपाध्ये यांनी सोने खरेदी करण्याचे ठरविले. त्यानुसार संबंधितांना फोन केला. आपली फसवणूक झाल्याचे उपाध्ये यांनी येथील पोलिसांना सांगितले. पुढील दोन किलो सोने कोपरगाव रस्त्यावरील टोल नाक्याजवळ देतो, असे संशयित आरोपींनी सांगितले. त्यांना येवला येथे बोलविले.
बसस्थानकाला शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. श्रावण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. अभिमन्यू आहेर व जगन मोरे यांनी सापळा रचून रोशन सोनवणे व घनश्याम मोहित यांना पकडले. शहर पोलिसांत अँड़ उपाध्ये यांनी तिघांविरुद्ध फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दोघांना आज येथील न्यायलयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीत कोठडी देण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने