नगरसूल येथे झाड मारुती व्हॅनवर कोसळून ४ ठार एक जखमी

येवला दि.१८ (अविनाश पाटील)- येवला तालुक्यातील नगरसुल येथे पिंपळाचे झाड
मारुती व्हॅनवर कोसळुन ४ जण जागीच ठार तर १ जण जखमी झाली आहे. मृतांमध्ये
पतीपत्नी सूनव नात यांचा समावेश असून ते नरसाराव पेठ, राजागरी कोटा
जि.गुंटूर आंध्रप्रदेश येथील रहिवासी होते. हे सर्व साईभक्त शिर्डी येथे
जाण्यासाठी आलेले होते.
एस.राधाकृष्ण मुर्ती (७०), एस. रंगन अय्याकाया (६२) हे पतीपत्नी तर
त्यांची सून एस.बालात्रिपूरा सुंदरी (३६), तसेच नात एस. हिमबिंदू
वेकंटसाई आज्ञा (१८) यांचा यामध्ये मृत्यू झाला.तर एस. अनुशा (१३) ही
जखमी आहे.
सकाळी ६.१० मिनीटांनी ते सिकंदराबाद-मनमाड अजिंठा एक्सप्रेसने नगरसूल
रेल्वेस्थानकावर उतरले . शिर्डी येथे जाण्यासाठी ते मारुती व्हँन MH-15
E-6652 मध्ये बसले. त्यावेळेस चालक इतर प्रवासी पाहण्यासाठी गेला होता
त्याचवेळेस रेल्वे विश्रामगृहाजवळील एक पुरातन पिपंळाचे झाड त्या गाडीवर
कोसळले. त्यामुळे या चौघाचा जागीच मृत्यू झाला. सदरचे झाड हलवण्यासाठी
१५० लोकांनी प्रयत्न केला पण ते अवजड झाड हलवण्यासाठी जेसीबी व लाकुड
कापण्याचे मशिन वापरावे लागले. झाड कापुन गाडीचा पत्रा कापून मृतांना
बाहेर काढले. जखमीवर शिर्डी येथे उपचार चालू आहे. या प्रकरणी तालुका
पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे .
थोडे नवीन जरा जुने