भिमगर्जना सोशल ग्रुप तर्फे बोधगया येथील बॉम्बस्फोटचा निषेध

काल बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा विविध संघटनानी निषेध
नोंदविलेला आहे. सुमारे २५०० वर्षापुर्वी संपुर्ण विश्वात समता शांती आणि
मानवतावादी मुल्यावर आधारीत वर्ग, वर्ण , जातविरहीत , करूणायुक्त धम्म
विचार रुजविणाऱ्या तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या बिहार येथील गया येथे
महाबोधी विहारात काही दहशतवादी प्रवृत्तीने देशात अशांतता माजविण्याचे
हेतूने बॉम्बस्फोट केले. त्यांचा धिक्कार करीत असल्याचे निवेदन येथील
भिमगर्जना सोशल ग्रुपने येवला तहसीलदार यांना दिले. हा हल्ला धार्मिक
प्रतिकावरील हल्ला नसून तो देशाच्या अस्मितेवरील हल्ला आहे. याचे
गार्भिंर्य लक्षात घेऊन शासनाने हल्लेखोर घटकांचा शोध घेणेची व कारवाई
करणेची मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर दिपक शशीकांत
गांगुर्डे,सचिन विष्णू साबळे,बैभव सुभाष भोसले, अविनाश गुलाब गांगुर्डे,
विनोद रामदास त्रिभुवन, संदिप विश्वनाथ घोडेराव,प्रविण देविदास नेतकर
आदिसह ४० कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने