राजापूर गटातील आदर्श यशोगाथा.....शेकडो एकर जमिन सुपिक..........बंधाऱ्यात मत्सव्यवसाय सुरु ...........आदिवासी बांधवाना मिळाले रोजगाराचे साधन

येवला - (अविनाश पाटील ) लोक सहभाग आणि तो जनतेच्या कामासाठी राबविण्याची
कला सर्वांनाच साधता येते असे नाही. पण येवला तालुक्यातील कायम दुष्काळी
असलेल्या पुर्व भागातील राजापुर जिल्हा परिषदेच्या सदस्याने ही कला
आत्मसात करुन हा भाग सुजलाम् सुफलाम् करण्याच्या दिशेने आपले पाऊल पुढे
टाकले आहे. जनसेवेचे ध्येय योग्य मार्गाने कसे गाठता येते याचे उदाहरण
त्यांनी समाजापुढे उभे केले आहे. मुळात शेतकरी हा एक होत नाही आणि आला तर
त्यांच्यातसमन्वय राहत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रबोधन करण्याचे
अवघड काम या तरुणाने लिलयापुर्ण केले. राजकारणासाठी पुढे येणाऱ्या
पुढच्या पिढीला चांगलाच आदर्श घालून दिला आहे. शेकडो ट्रॅक्टर अविरतपणे
गाळ वाहण्याचे काम करीत होते. त्यामुळेकितीतरी पटीने साठवण क्षमता वाढली
आहे
यंदाचा भिषण दुष्काळ हा राजापुर जि.प गटातील शेतकरी वर्गासाठी इष्टापत्ती
ठरला आहे. या भागातील बंधारे , पाझर तलाव हे पुर्णतः कोरडे पडले होते.
यामध्ये वर्षानुवर्षे साठलेल्या गाळ काढण्याचे या भागाचे जि.प सदस्य
प्रविण गायकवाड यांनी मनावर घेतले . गाळ काढून शेतात टाकण्याचे त्यांनी
गावोगावी फिरून आवाहन केले . सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला.नंतर
जमिनीची सुपिकता व पोत वाढेल असे लक्षात आल्याने या भागातील शेतकरी
जोमाने गाळवाहतूक करू लागले . जमिनीची सुपिकता वाढली तसेच शेकडो एकर
नापिक,खडकाळ जमिन सुपिक झाली. या बरोबरच शेकडो ब्रास गाळ निघाल्याने या
बंधाऱ्याच्या साठवण क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली आहे. यंदाच्या
पहिल्यापावसात हे बंधारे भरुन वाहू लागल्याने या परिसरात उत्साहाचे वारे
वाहू लागले आहे.
आरक्षणामुळे राजापूर जिल्हा परिषद गटाची जबाबदारी उच्चशिक्षीत अश्या
भटक्या जमातीतील प्रविण गायकवाड यातरुणावर पडली.आज प्रस्थापित राजकारणी
आपल्या पदाचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी करत असल्याचे दिसते. पण या जि.प
सदस्याने कामाचा अक्षरक्षः धडाकाच सुरु केला . जनजागृतीसाठी त्यांनी
केलेल्या प्रयत्नाचे फळ त्यांना आत्मानंदाच्या माध्यमातून मिळत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात भरलेल्या दहा पाझर तलावांमध्ये मच्छीबीज सोडण्यात
येणार असून, त्याची सुरुवात अंगुलगाव येथील तीन पाझर तलावांपासून करण्यात
आली.
जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते व सरपंच सर्जेराव
पाटील, ग्रामपंचायत सदस्य परमानंद जाधव, प्रिया झाल्टे यांच्या उपस्थितीत
सदरचा कार्यक्रम पार पडला. तिन्ही पाझर तलावांत 50 डबे मच्छीबीज सोडण्यात
आले. प्रत्येक डब्यात एक हजार मासे असतात. सहा महिन्यांच्या काळात एक
मासा 500 ते 900 ग्रॅम वजनाचा होऊ शकतो. यामुळे या भागातील आदिवासी
बांधवाना चांगलाच रोजगार मिळालेला आहे. देवदरी, अंगुलगाव, राजापूर,
रहाडी, सोमठाण जोश, डोंगरगाव, कोळगाव, कोळम बुद्रुक, न्याहारखेडे,
ममदापूर या गावांमधील आदिवासी बांधवांचे गट तयार करून त्यांना मच्छी
प्रशिक्षण विकास विभागाकडून देण्यात येणार आहे. पाझर तलावातील गाळ
काढल्याने यंदाच्या पावसाळ्यात त्यात मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा होऊन
शेतकर्‍यांना फलदायी ठरणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे.
प्रविण गायकवाडाच्या कार्याचे श्रेय फक्त त्यांनाच जात आहे. महात्मा फुले
जलसंसाधरण चळवळीचा त्यांनी लोकसहभागातून चांगला प्रयोग आपल्या
गटातराबविला आहे. कोणतीही योजना चांगला प्रतिनिधी कसा राबवू शकतो याचे
मूर्तिमंत उदाहरण त्यांनी प्रस्थापित राजकारण्यापुढे उभे केले आहे.
मा.शरद पवार यांच्या येवला दौऱ्यात पालकमंत्री मा. भुजबळ साहेबांनी
प्रविण गायकवाड यांच्या या कामाविषयी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढून
कौतुक केले होते.
थोडे नवीन जरा जुने