प्रशासकिय कार्यालय आवारात नगराध्यक्षांनी केले वृक्षारोपण

येवला - निसर्गाचे सर्वश्रेष्ठत्व जगन्मान्य आहे.
मानवाने निसर्ग नियमात केलेल्या ढवळाढवळीचे असंख्य दुष्परिणाम आपण आज
अनुभवीत आहोत. वाढलेले प्रदुषणाला काबूत आणण्याचे काम वृक्ष करीत असतात.
त्यासाठी गरज आहे वड, पिपंळ यासारख्या धार्मिक मान्यतेच्या बहूवर्षायू
वृक्षलागवडीची. कारण वडाची सावली व पिपंळाचे महत्व धार्मिकतेबरोबर
पर्यावरणाला अतिशय अनुकुल आहे. हिंदी मधील माननीय डॉ. डंडा लखनवी जी च्या
इन्हें कारखाना कहें, अथवा लघु उद्योग।
प्राण-वायु के जनक ये, अद्भुत इनके योग॥
वृक्ष रोप करके किया, खुद पर भी उपकार।
पुण्य आगमन का खुला, एक अनूठा द्वार॥ या दोह्यातील उक्ती प्रमाणे येवला
शहराची हरित येवला अशी ओळख करण्याचे ठरविलेल्या नगराध्यक्ष निलेश पटेल
यांच्या कल्पनेतून शहरातील नववसाहतीमध्ये तसेच शाळा,कॉलेज,शासकिय
कार्यालये येथे ५० हजार वृक्षारोपण व रोपवाटपाचा कार्यक्रम यापुर्वीच
झालेला आहे. त्याबरोबर बहुवर्षायू वृक्ष वड , पिपंळ यांची १० वर्षे वयाची
मोठी झाडे गुजरात राज्यातील बिल्ली मोहरा येथून आणण्यात आली. दि.२५ रोजी
प्रशासकिय संकुलामध्ये यांचे वृक्षारोपण तहसिलदार हरिष सोनार, बाळासाहेब
लोखंडे, लोंढे नाना नायब तहसिलदार विनायक थविल यांच्या हस्ते नगराध्यक्ष
निलेश पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रसंगी प्रत्येकाने किमान
एकतरी वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी असे मनोगत निलेश पटेल यांनी
व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सा.बां विभागाचे श्री.तांबे,श्री.घोलप
यांच्यासह कर्मचारीवृंद उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने