पानटपरीधारकांवर अन्याय करू नये....................

येवला -   सुगंधी तंबाखू व सुपारी वरील बंदी उठवून   सर्व पान
टपरीधारकांना काही अटी, शर्ती लावून तंबाखू विक्रीस परवानगी द्यावी, अशी
मागणी शहरातील पान टपरीचालकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
आहे. शासनाने एक वर्षापूर्वी गुटखा बंदी लागू केली. त्यानंतर आता
तंबाखूवर बंदी आणली आहे. शासनाने इतर अमली पदार्थांवर दुर्लक्ष करून
आमच्यासारख्या सामान्य पानटपरीधारकांवर अन्याय करू नये, पानटपरीवर नेमका
कोणता माल विक्रीस ठेवावा, या विवंचनेत आम्ही असून आम्हास न्याय मिळावा,
असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर अनिल ताठे, र्जरार पहिलवान, दर्शन पान,
विजय सोनवणे, जाकीर अन्सारी, भगवान रोठे, सतिश कायस्थ, दिलीप शिडे, मनोज
गुडेकर, आनंद नियाती आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
थोडे नवीन जरा जुने