संतोष खाजगी बाजार समिती मध्ये मका खरेदी सुरु..........

येवला - (अविनाश पाटील) शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला रोख रक्कमेबरोबर
संतोष खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीने एक लाख रुपयांचा वैयक्तिक विमा
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मका खेरदीचा शुभारंभ करताना संतोष
बाजार समितीचे अध्यक्ष किशोर दराडे यांनी ही माहिती दिली. येवला
तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झालेले आहे प्रचलित
बाजार समितीमध्ये मक्याच्या व्यापाऱ्याचे खळे फुल झाले असून खाजगी
व्यापारी चे खळे फुल झालेले आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात मका विक्री
करावी लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर संतोष
खाजगी बाजार समितीने मका खरेदी सुरु केल्याचेही दराडे यांनी सांगीतले.
नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव खाजगी बाजार समिती म्हणून संतोष बाजार समिती
ओळखली जाते.
नगर मनमाड रस्त्यावरील धानोरे शिवारातील आवारात मका खरेदी शुभारंभ माजी
नगराध्यक्ष रामदास दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आधारभूत
किमंतूनुसार मक्याला सर्वाधिक १३२५ रुपये प्रति क्विंटल चा भाव देणेत
आला. यापुढे मक्याला गुणवत्तेनुसार भाव देणेत येईल शिवाय रोख रक्कम अदा
केली जाईल . शेतकऱ्याच्या सोयीसाठी रविवारसह मंगळवार,बुधवार,गुरुवार या
चार दिवशी मका खरेदी संतोष खाजगी बाजार समितीमध्ये चालू राहणार आहे. मका
विक्रीसाठी येताना सातबारा उतारा, व रहिवासी दाखला बरोबर आणण्याचे आवाहान
ही दराडे यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने