येवला तालुक्यातील कुसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तू महादू गायकवाड
यांची अविरोध निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीनुसार दत्ता संपत गायकवाड
यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक
घेण्यात आली.
मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डी. वाय. गांगुर्डे यांच्या
अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी 2 वाजता विशेष सभा बोलावण्यात आली.
तत्पूर्वी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
होती. परंतु, त्या वेळेत सत्ताधारी विकास पॅनलच्या वतीने ग्रा. प. सदस्य
दत्तू महादू गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दुपारी विशेष सभेत
अधिकारी गांगुर्डे यांनी दत्तू महादू गायकवाड यांची अविरोध निवड झाल्याची
घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्ते व सदस्यांनी जल्लोष केला.
नवनिर्वाचित सदस्य गायकवाड यांचा खरेदी-विक्री संघाचे संचालक दिलीप मेंगळ
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामसेविका वाय. डी.
मत्सागर, सोसायटीचे अध्यक्ष रामदास हारदे, भास्कर मेंगाळ, नारायण
गायकवाड, ग्रा. पं. सदस्य वर्षा अहिरे, सुशीला गायकवाड, रामदास मोरे,
विमल गायकवाड आदी उपस्थित होते.